Saransh lekhan in marathi : आपल्यासमोर सारांश Saransh लेखनासाठी जो उतारा येतो त्याचे सार, त्याचा गाभा, त्याचे मर्म आपल्याला आपल्या भाषेत प्रकट करावयाचे असते. तुम्हाला त्या उताऱ्यातील विषय- आशय नेमका कळला आहे की, नाही हे तुमच्या सारांश लेखनातून प्रकट होत असते. त्यामुळे उताऱ्याचा १, सारांश लिहा, यामध्ये मूळ उताऱ्यातील एकूण ओळींच्या , ओळी आपल्या सारांश लेखनात हव्या हे बंधन आहेच; पण त्याचबरोबर मूळ विषयही आपण नेमक्या तेवढ्या ओळीच्या आकृतिबंधातून साररूपाने प्रकट केला पाहिजे, हेही महत्त्वाचे आहे.
उतारा वाचताना आपण त्या उताऱ्यातील विचारांचे पृथक्करण मनोमन केले पाहिजे. म्हणजे विषयाचे नेमके आकलन आपणास होईल. कोणते विचार मांडले आहेत ? त्यात संगती कोणती ? तो विषय मांडताना कोणती उदाहरणे दिली आहेत ? कोणते शब्दालंकार, अर्थालंकार साधले आहेत ? त्या विचारांचा परिपोष कसा केला आहे ? हे लक्षात घेतले पाहिजे.
नंतर त्यातील मूळ आणि मुख्य विषय हा त्या परिच्छेदातील मुद्दे आणि महत्त्वाचे शह यांच्या साहाय्याने आपली स्वतःची वाक्ये तयार करून आपल्या भाषेत स्पष्ट केला पाहिजे. असे करताना उताऱ्यातील उदाहरणे असतील त्यांची गुंफण १-२ वाक्यांत एकत्र करावी. त्यातील पाल्हाळ, पुनरुक्ती अथवा फापटपसारा असल्यास काढून टाकावा. तसेच अलंकारही सारांश लेखनात वगळावेत. त्या अलंकारामागील मर्म नेमके प्रकट करावे. हे सक्षात घ्यावा, शद्वांचा फुलोरा हा सारांश लेखनात वर्ज्य आहे. मूळ ‘सार’ आपण हंसक्षीर न्यायाने प्रकट करावयास हवे.
⅕ , सारांश लिहिताना वाक्ये, भाषा पद्धती आपली स्वतःची हवी. महत्त्वाचे श आणि मुद्दे मूळ लेखकाचे पण सारांश लेखनाची भाषा वाक्ये आपली स्वतःची हवीत. मग ते सारांश लेखन आपले स्वतःचे हवे. त्यावर आपला ठसा हवा. सारांश लेखन ही सुद्धा एक कला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
Sandhi In Marathi – संधी व संधिनियम मराठीमध्ये
Saransh Lekhan In Marathi – सारांश लेखनासाठी आपण खालील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.
- दिलेला उतारा कमीतकमी दोनदा वाचावयास हवा.
- दुसऱ्या वाचनाच्या वेळी त्या उताऱ्यातील विषय आशय, महत्त्वाचे मुद्दे आपल्या लक्षात येतील.
- त्या मुद्द्यांची मांडणी विशिष्ट ओळींच्या आकृतिबंधातून, आपली स्वतःची वाक्ये करून केली पाहिजे. दिलेल्या उताऱ्यातील वाक्ये जशीच्या तशी घ्यावयाची नाहीत.
- उताऱ्यातील विचार गाभा प्रकट करताना ‘कमीत कमी शद्वात जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करण्याचे, आपले कौशल्य प्रकट होणे आवश्यक आहे.
- आपल्या सारांश लेखनाच्या उताऱ्याचीही सुसंगत मांडणी हवी. स्वतंत्रपणे वाचल्यास तोही एक स्वयंपूर्ण, स्वतंत्र उतारा वाटावयास हवा.
10th saransh lekhan in marathi : विद्यार्थी मित्रानो, पुढे काही मूळ उतारे व त्याचे सारांश लेखन करून दाखविले आहेत. त्याचा तुम्हास मार्गदर्शनासाठी उपयोग होईल.
Saransh Lekhan In Marathi – गद्य उतारा क्र. 1
एकीकडे स्वभाषेचा दर्जा वाढविण्याची भाषा करणे व दुसरीकडे हिंदी ही हिंदुस्थानची राष्ट्रभाषा करण्याचीही गोष्ट करणे, इंग्रजीचे महत्त्व कमी होता कामा नये असेही एकीकडे मनातून वाटत राहाणे, हा सर्व वैचारिक गोंधळ आहे. जोपर्यंत इंग्रजीखेरीज आपला राज्यकारभार व आपले उच्च शिक्षण चालणे शक्य नाही असे. काही विद्वानांना मनात तरी वाटत आहे; तोवर आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो नाही असेच म्हटले पाहिजे. इंग्रजीच्या उच्चाटनाने शिक्षणाचा दर्जा खालावेल ही कल्पना म्हणजे एक अर्धसत्य आहे. आपल्या शिक्षणाचा दर्जा जर आजवर खराच उच्च असता तर एव्हाना विविध देशी भाषेत विविध विषयांवरील ग्रंथांची वाण पडलीच नसती. खरे ज्ञान तेच की, ज्याचे फल ग्रंथरूपाने स्वजनास चाखावयास मिळते. वस्तुस्थिती अशी आहे की, आजवर इंग्रजी ही अध्यापनाची व संदर्भग्रंथाची भाषा असूनही आपले बहुसंख्य विद्वान परीक्षार्थी व प्रपंचार्थीच राहिले. त्यांच्या हातून देशी आपत काय किंवा इंग्रजीत काय, रचना बेताचीच झाली.
Saransh Lekhan In Marathi – सारांश: एकाच वेळी स्वभाषा, हिंदी आणि इंग्रजीचे स्थान कायम ठेवण्याची भूमिका घेणे ही वैचारिक गोंधळाचेच लक्षण होय. इंग्रजीशिवाय तरणोपायच नाही असे समजणे परतंत्र वृत्तीचे द्योतक. इंग्रजीखेरीज आमची शिक्षणश्रेणी उंचावेल. आजपर्यंत ती ज्ञानभाषा “असूनही मातृभाषा कंगाल राहिली. बहुसंख्य विद्वानः परीक्षार्थी प्रपंचाच बनले.
Saransh Lekhan – गद्य उतारा क्र. 2
saransh lekhan in marathi – सौंदर्याचा अनुभव घडविणे हा सर्व कलांचा सामान्य हेतू आहे. चित्रकला हा अनुभव रेखांच्या द्वारे घडविते. गायनकला कर्णद्वारा व नृत्यकला नेत्र व कर्ण या दोन्हीच्या साह्याने घडविते. ललित कलेचे स्वरूप या सर्वांहून भिन्न आहे. पंचेंद्रियापेक्षा माणसाच्या बुद्धीच्या द्वारेच ती त्याला सौंदर्य प्रत्यय घडवीत असते. नाटक रंगभूमीवर होत असले म्हणजे त्याला दृश्य व श्राव्य हे स्वरूप येते हे खरे, पण त्या वेळी देखील त्यातील रसास्वाद घेण्याची व रचनाचातुर्याचा आनंद उपभोगण्याची क्रिया डोळे व कान यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी आपली बुद्धीच करीत असते. चित्रकला, गायनकला इत्यादिकात रससेवनाचे काम मुख्यत्वे इंद्रिय करतात. मधुर स्वरमालेतील सौंदर्याचा उपयोग एकटे सौंदर्यच घेते, त्यात बुद्धीने केलेल्या कौतुकाची भर पडली तर आल्हाद अधिक वाढतो इतकेच. नृत्यकलेपासून मिळणाऱ्या आल्हादाबद्दल असेच म्हणता येईल, पण लेखनकलेचे तसे नाही. लेखनकलेचा मोहरा सर्वदा बुद्धीकडे फिरलेला आहे व वाचक प्रेक्षकांच्या बुद्धीला गुदगुल्या कशा करता येतील हेच लेखकाने नेहमी पाहिले पाहिजे.
Saransh – सारांश : सौंदर्यावाद हाच सर्व कलांचा हेतू असतो. तरीही अन्य कलांपेक्षा ललितकला भिन्न आहे. ती पंचेद्रियापेक्षा बुद्धीद्वारेच सौंदर्याविष्कार करते. नाट्याला दृश्य आणि श्राव्य स्वरूप लाभूनही त्याचा रसास्वाद इंद्रियापेक्षा बुद्धीच घेते. ललितेतर कलांच्या इंद्रियाधिष्ठित रसास्वादात बुद्धीमुळे थोडीफार भर पडली तरीही ललितकलांचा सारा मोहराच बुद्धीकडे असतो.
गद्य उतारा क्र. 3
या भूतलावर अशी एक जागा पाहिजे की, त्यावर कोणतेही राष्ट्र आपली सार्वभौम सत्ता सांगणार नाही. त्या ठिकाणी या जगतातील कोणत्याही इतर नागरिकांप्रमाणे मुक्तपणे, मोकळेपणाने राहता येईल. अंतिम श्रेष्ठ सत्याचाच त्या ठिकाणी फक्त अधिकार राहील. ती जागा जीवनातील सुसंवाद साधणारी असेल. जिथे मानवी जीवनातील मूलभूत चिन्मय प्रेरणा दुःखाचे बीजच नष्ट करण्यासाठी वापरल्या जातील आणि मानवी जीवनातील दुर्बलतेवर, त्याच्या मर्यादेवर मात करतील. या ठिकाणी बालके आपल्या मातृभूमीशी संबंध राखून मोठी होऊ शकतील. केवळ परीक्षेत लौकिकदृष्ट्या उत्तीर्ण होऊन प्रमाणपत्र किंवा हुद्दा मिळविण्यासाठी या ठिकाणी शिक्षण दिले जाणार नाही, तर सामाजिक जीवन संपन्न करण्यासाठी शिक्षण दिले जाईल. बौद्धिक, नैतिक व आध्यात्मिक स्वरूपाचे कार्य करणाऱ्या संघटना आणि त्यातील वरिष्ठ अधिकारी केवळ मानवी आनंद आणि जीवन-शक्ती वाढविण्यासाठी न झटता मानवी कर्तव्ये, जबाबदारी यासाठी प्रामुख्याने काम करतील. थोडक्यात सांगायचे तर सर्वसाधारण जगात ज्या स्पर्धेवर, ईर्षेवर मानवी जीवन आधारित असते त्या ईर्षेचा उपयोग जीवनातील चांगले कार्य करण्यासाठी, संघटित होण्यासाठी आणि बंधुत्वाचे नाते निर्माण करण्यासाठी येथे होईल.
Saransh – सारांश : जेथे कोणालाही मुक्तपणे वावरता येईल अशी या भूतलावर एक जागा हवी. तेथे फक्त अंतिम सत्याचाच अधिकार राहील. ती जागा जीवनातील संवाद साधणारी चिन्मय प्रेरणेद्वारे दुःख घालविणारी, दुर्बलतेवर मात करणारी, बालकांना कृत्रिम शिक्षणापेक्षा जीवन शिक्षण देणारी आणि आनंदाबरोबरच मानवी कर्तव्यासाठी झटणारी असेल; ज्या ईवेंवर जग जगते ती तेथे बंधुत्वासाठी वापरली जाईल.
गद्य उतारा क्र. 4
saransh lekhan in marathi – शाळेतील शिक्षण जन्मभर पुरत नाही, यास्तव ‘ग्रंथ हेच आपले गुरू होत’ असे एक सुभाषित आहे. या सुभाषितकारांचा हेतू शाळेतील शिक्षणाला कमी लेखण्याचा खचितच नाही; तर ग्रंथाचे माहात्म्य त्याला वर्णावयाचे आहे. आयुष्यभर उपयोगी पडेल अशी ज्ञानाची पुंजी विद्यार्थ्याला देणे हे गुरूचे कर्तव्य आहे. ग्रंथ हे कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडतातच, परंतु हे ज्ञान देताना ते आपली उच्च दर्जाची करमणूकही करीत असतात. राष्ट्राचे वाङ्मय ही एक सांस्कृतिक ठेव असते आणि राष्ट्रातील जनतेला तिचा फायदा मिळतो. वाङ्मय हे केवळ लालित्यपूर्ण किंवा मनोरंजनप्रधानच असते, असे समजण्याचे कारण नाही. इतिहास, शास्त्रे, पुराणे, काव्ये, नाटके हे सर्व प्रकार वाङ्मयातच मोडतात. शास्त्रे पुराणे आपणास धर्म व संस्कृती शिकवितात. इतिहास पूर्वजाची थोरवी वर्णन करून आपणास आशा आणि स्फूर्ती देतो. काव्य व नाटके हे ललित वाङ्मय जीवनाचे विशाल दर्शन घडवून आपले मनोरंजन करते. उच्च प्रकारचे वाङ्मय मनोरंजनाबरोबर समाजाच्या विचार प्रवाहालाही वळण देऊ शकते. क्षणभंगुर जीवनातील थोर व अविस्मरणीय क्षण वाङ्मयात निबद्ध झाले म्हणजे चिरंजीव होतात. तात्पर्य, संस्कृती, धर्म, मनोरंजन व जीवनाचे विशाल दर्शन या सर्वांची अनुभूती ग्रंथ आपणास देतात.
Saransh- सारांश : गुरूपेक्षा ग्रंथच जीवनोपयोगी ज्ञानपुंजी अधिक देत असतात, म्हणून ज्ञान आणि करमणूक करणारे वाङमय ही सांस्कृतिक ठेव आहे. ललित व ललितेतर हे सारे वाङ्मयच ! ललितेतर वाङ्मय आपणास धर्म, संस्कृती, आशा आणि स्फूर्ती देते आणि काव्य, नाटक जीवनदर्शनाबरोबरच मनोरंजनही करते. विचार प्रवाहास वळणही लावते. जीवनातील क्षणभंगूर क्षणांना चिरंजीव करते. म्हणूनच ग्रंथ हेच जीवनाचे विशाल व चौफेर दर्शन घडवितात.
गद्य उतारा क्र. 5
मानवजातीचे दुःख कमी व्हावे, सुख वाढावे, तिची समृद्धी व्हावी, विविध पुखविलास तिच्या आटोक्यात यावेत म्हणून ज्या संशोधकांना, शास्त्रज्ञांना तळमळ गून राहिली होती त्यांनी विज्ञान देवतेची अहर्निश उपासना करून तिच्यापासून किती हे वरदान संपादन केले आहेत ते पाहा. रेडिओ, विमान, चित्रपट यासारखी साधने शास्त्रज्ञांनी मानवाला उपलब्ध करून दिली आहेत. पेनिसिलिन, स्ट्रेप्टोमायासिन अशा प्रभावी औषधांच्या साहाय्याने अनेक दुर्धर रोगापासून मानवजातीची त्यांनी मुक्तता केली आहे. फार काय सांगावे अतिशय कठीण आणि किचकट प्रश्न क्षणार्धात सोडवून टाकणारी यांत्रिक मेंदूसारखी विलक्षण उपकरणेदेखील त्यांनी शोधून काढली आहेत. हे सारे त्यांनी कशाच्या मदतीने निर्माण केले? विज्ञानाच्या ना ? यावरून एकच गोष्ट सिद्ध होते. ती ही की, विज्ञानाचा जर मानवजातीच्या सुखसंवर्धनासाठी उपयोग करून घेतला तर या जगाला नंदनवनाची शोभा येईल; पण त्याच विज्ञानाचा संहारार्थ उपयोग करून घेतला तर या विश्वाची राखरांगोळी होऊन जाईल. बुद्धिमान आणि सुसंस्कृत मानवाला विज्ञान हे एक मोठे प्रभावी हत्यार लाभले आहे. त्या हत्याराचा उपयोग कसा करून घ्यावा हे मात्र त्याचे त्यानेच ठरवावयाचे आहे..
Saransh- सारांश : मानवाचे दुःख नाहीसे होऊन त्याला सुख लाभावे यासाठी संशोधकांनी – – शास्त्रज्ञांनी विज्ञानदेवतेची रात्रंदिवस उपासना केली. त्याचे फळ म्हणूनच रेडिओसारखी सुखवर्धक, पेनिसिलिनसारखे दुःखनाशक व यांत्रिक मेंदूसारखे लाभदायक वर मानवाला मिळाले व त्याचे जीवन अधिक सुखकर झाले. विज्ञान हे मानवाला लाभलेले प्रभावी शस्त्र आहे त्याचा कसा उपयोग करायचा हे त्यानेच ठरवायचे.
गद्य उतारा क्र. 6
saransh lekhan in marathi – भारतातील अनेक भेद त्याच्या प्रगतीच्या मार्गात विघ्ने आणीत आहेत. व्यक्तीचा स्वार्थ, जातीयता, धर्मांधता, प्रांतियता, भाषा दुरभिमान इत्यादी अनेक विकारांनी भारत छिन्नविच्छिन्न झाला आहे. त्यात एकात्मता कशी निर्माण करावी, कलहाचे बीज असा जो अनेक प्रकारचा भेदभाव त्याचा नाश कसा करावा याची डोकेदुखी अधिकाराधिष्ठित सरकारला व इतर धुरीणांनाही लागलेली आहे. हा प्रश्न नवा नाही किंवा भारतापुरताच मर्यादित नाही. कुटुंब, ग्राम, देश, विश्व या सर्व क्षेत्रात हा प्रश्न सदाच ठाण मांडून बसला आहे. त्याचे वाईट परिणाम विशेष उत्कटत्वाने जाणवत नाहीत. तोपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करता येते; परंतु त्यातून दैनंदिन जीवनच अस्ताव्यस्त होऊ लागले म्हणजे त्याकडे लक्ष देऊन त्याच्यावर तात्कालिक उपाय योजणे सरळ होते.
Saransh- सारांश : भेद, स्वार्थ, जातीयता यामुळे भारत खिळखिळा झाला आहे, एकात्मता निर्मिणे हा नेत्यापुढे प्रश्न आहे. हा प्रश्न जागतिक आहे. दुष्परिणाम होईपर्यंत तो दुर्लक्षिता आला तरी त्याचा जीवनावर आघात होऊ लागल्यावर उपाय योजणे आवश्यक ठरते.
गद्य उतारा क्र. 7
शिवाजी महाराजांची विश्वसनीय चित्रे पाहून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा जमा मनावर उमटतो; तशीच त्यांच्या निरपवाद प्रगतीपरतेचीही खात्री पटते. त्यांच्या रुद कपाळावरून बुद्धिमत्तेचा प्रत्यय येतो. गरुडासारखे नाक निग्रह व निश्चय दर्शविते. स्वच्छ पण भेदक डोळे, निर्मळ मन, खोल विचार आणि तडफ यांची साक्ष पटवितात. तर दाढी. झगा व डौलदार पागोटे हा त्या काळी रूबाबदार समजला जाणारा, त्यांनी स्वीकारलेला पोशाख हा त्यांची आघाडीची मनोवृत्ती दाखवितो. त्या काळच्या दंडकाप्रमाणे पाहता शिवाजी महाराज लोकांवर छाप बसावी म्हणून कपडे घालणारे, बारीक सारीक तपशिलात लक्ष देणारे, जीवनातील श्रेष्ठ आनंद अनुभवणारे व अनुभवणे शक्य करणारे पुरोगामी नेते वाटतात. नवे राष्ट्र उभे करण्याला पोषक अशा सर्व विषयक गोष्टींचा विचार धावपळीच्या जीवनातदेखील त्यांनी केला. राज्याभिषेकाच्या प्रसंगाने अष्टप्रधानाची मूळ फारसी नावे बदलून त्यांनी संस्कृत नावे रूढ केली. त्यासाठी संस्कृत भाषेत राज्यव्यवहार कोश करवून घेतला. नेताजी पालकर निमित्ताने बाटून मुसलमान झाला होता; त्याला त्यांनी फिरून हिंदुधर्मात शुद्ध करून घेतले. ही त्यांची मूलग्राही प्रगतीप्रियता त्या काळच्या समाजाच्या कल्पनांच्या मानाने फार धाडसाची समजली पाहिजे.
Saransh- सारांश : शिवाजी महाराजांच्या चित्रावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व प्रगतीपरतेचा प्रत्यय येतो. त्यांच्या कपाळावरून बुद्धिमत्तेचा, नाकावरून निग्रहीपणाचा, डोळ्यांवरून निर्मळ मनाचा प्रत्यय येतो. त्यांचा पोशाख हाही पुरोगामी वृत्ती दर्शवितो. धावपळीच्या जीवनातील सर्व विधायक गोष्टींचाही ते विचार करीत. प्रधानांची नामांतरे, नेताजी पालकरास स्वधर्मात घेणे, संस्कृतकोश निर्मिती ही त्यांची कार्ये त्या काळाच्या मानाने धाडसाचीच म्हटली पाहिजेत.
गद्य उतारा क्र. 8
saransh lekhan in marathi – आई, बाप, गुरू व संत यांच्या ठिकाणी परमात्मा पाहा. तसेच लहान मुलांच्या ठिकाणी जर परमात्मा पाहता आला तर केवढी बहार होईल! ध्रुव, प्रल्हाद, नचिकेत, सनक, सनंदन, सनत्कुमार सारी लहान लहान मुले. परंतु त्यांना कोठे ठेवू, कोठे न ठेवू असे पुराणकारांना, व्यासादिकांना झाले आहे. शुक्रदेव, शंकराचार्य बालपणीच विरक्त. ज्ञानदेवही तसेच. सारी ही पोरे, परंतु त्यांच्या ठिकाणी परमेश्वर जितक्या शुद्ध रूपाने अवतीर्ण झाला तितक्या शुद्ध रूपाने अन्यत्र प्रकट झाला नाही. ख्रिस्ताला मुलांचा फार लळा असे. एकदा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, “तुम्ही नेहमी देवांच्या राज्याविषयी बोलत असता. या देवाच्या राज्यात प्रवेश तरी कोणाला ?” जवळ एक मुलगा होता. ख्रिस्ताने त्याला टेबलावर उभे करून म्हटले, “या मुलासारखे जे असतील त्यांचा प्रवेश येथे होईल. ख्रिस्ताने म्हटले सत्य आहे.
Saransh- सारांश : मातापित्यादी वंदनीय व्यक्तीप्रमाणेच बालकांच्या ठिकाणी परमात्मा पाहणे फारच बहारीचे ! व्यासादिकांनाही पुराणकालीन धोर बालकांचेच कौतुक वाटते. विरक्त बाल अशा शंकराचार्य-ज्ञानेश्वराच्या ठिकाणीच परमेश्वर शुद्ध रूपात विलसतो… ‘देवराज्यात प्रवेश कोणाला ?’ असे ख्रिस्ताला एकदा शिष्याने विचारल्यावर त्याने समोरच्या बालकाचाच निर्देश केला.
गद्य उतारा क्र. 9
शिवाजीच्या स्वभावात अगदी लहानपणापासून काटकपणा व धाडस हे गुण वाढले याचे आश्चर्य वाटायला नको. हा मुलगा आपल्या आईचा निस्सीम भक्त होता. त्याचा बाप त्याच्याबरोबर कधीच राहिला नाही. आई मात्र निरंतर त्याच्याजवळ होती. साच्या आयुष्यात तीच त्याची मार्गदर्शक आणि संरक्षक देवता होती. तिची पसंती म्हणजे साया श्रमाचे बक्षीस व त्या योगाने त्याच्यात जे धैर्य संचरून उचंचळले ते कसल्याही विघ्नांना जुमानीत नसे. शिवाजीच्या स्वभावातील धार्मिक वळण आणि आपल्या जीवनाच्या इतिकर्तव्याविषयी बळकट श्रद्धा हे गुण त्याला आईकडून मिळाले होते. आईने त्याला पुराणातील युद्धाच्या व शौर्याच्या कथांचे अक्षरश: बाळकडूच पाजले होते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगी ते आधी तिचा आशीर्वाद घेत असत आणि ती देवावर विश्वास ठेवून त्याला भयंकर साहसाची कृत्ये साधण्याची प्रेरणा देत असे. थोर पुरुषांचा थोरपणा जर आईच्या शिकवणीतील स्फूर्तीवर अवलंबून ● असेल तर शिवाजीच्या कामगिरीत जिजाबाईचा वाटा अव्वल मानावा लागतो. त्याच्या बळाचे जिजाबाई हेच प्रमुख कारण होते.
Saransh- सारांश : शिवाजीच्या स्वभावातील गुणांना नेहमी जवळ असणारी त्याची मार्गदर्शक आईच अधिक कारणीभूत आहे. तिच्यामुळेच तो धैर्यवान, श्रद्धाशील, धर्मप्रवण व शूर बनला. आईनेच त्याला पुराणातील युद्धकथांचे बाळकडू पाजले. म्हणूनच तो नेहमी आपल्या आईपासून आशीर्वाद व प्रेरणा घेत असे. म्हणूनच शिवाजीच्या कामगिरीत जिजाबाईचा वाटा अव्वल मानावा लागतो.
गद्य उतारा क्र. 10
saransh lekhan in marathi – प्रचाराचे खरे साधन कृती हेच होय. तथापि ज्याप्रमाणे प्रसंगी मत प्रतिपादनाची जरुरी • कल्पून घेतली त्याप्रमाणे मत प्रतिपादनातूनही कचित दुसऱ्याच्या मतातील चूक दाखविण्याचा प्रसंग कल्पिता येईल. पण दुसऱ्याने मत खोडून काढणे निराळे आणि दुसऱ्यालाच खोडून काढणे निराळे ! एखाद्या मतातील असारता दाखविताना मनुष्यालाही त्यामध्येच गुल् टीका करणे गैर आहे. नारळाची कवटी फोडून अगदी आतून खोबरे घ्यावे त्याप्रमाणे मनुष्याचे मत, चुकीचे वाटल्यास सोडून आतला माणूस ग्रहण करता आला पाहिजे. नदीचे वळण वाकडे असले तरी ज्याप्रमाणे पाणी वाकडे असत नाही, किंवा भाकरी वाटोळी असली तरी.
तिची गोडी वाटोळी असत नाही. त्याप्रमाणे मनुष्याचे मत जरी कदाचित दूषित असले तरी आतला माणूस दूषित नसतो. नदीचे वळण किंवा भाकरीचा आकार ही जशी बाह्य परिस्थितीने । बनलेली असतात त्याप्रमाणे मुनष्याच्या मताचे आहे. म्हणूनच मताचा विचार करताना माणूस बाजूलाच राखला पाहिजे.
Saransh – सारांश : प्रचाराचे खरे साधन कृती हीच आहे. तरीही स्वमत प्रतिपादन परमत दोष दर्शन हेही कल्पिता येईल. परमत दोषावेळी दुसऱ्यालाच खोडू नये. नारळ कवचासम चुकीच्या मतामधील माणूस घ्यावा. सरिता जल वा भाकरीची चव त्यांच्या बाह्याकाराप्रमाणे नसते, त्याप्रमाणे दूषित मतातही दूषित माणूस नसतो. म्हणून माणूस सारूनच मताचा विचार करावा.
अधिक गद्य उताऱ्यांसाठी या वेबसाईट ला भेट द्या Shaalaa